मुंबई – बीसीसीआयने कॅरिबियन भूमीवर होणाऱ्या वेस्टइंडीज विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी आज भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघ इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर वेस्टइंडीज विरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी २० खेळणार आहे. त्यापैकी फक्त एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे.
सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार असेल तर रविंद्र जडेजाकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तर नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, मोहम्मद शामी या सर्व खेळाडूंना बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. गेल्यावर्षी झालेल्या श्रीलंका दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांत शिखर धवनने भारताचे नेतृत्व केले होते.
भारताच्या वेस्ट इंडिज आणि अमेरिका दौऱ्याची सुरुवात २२ जुलैपासून होणार आहे. सुरुवातीला तीन एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. त्रिनिदाद येथील सामन्याने मालिकेची सुरुवात होईल. त्यानंतर पाच टी २० सामन्यांची मालिका होईल. टी २० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत.
वेस्टइंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन (दोघेही यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम