श्रीरामराव आहेर पतसंस्थेच्या निवडणुकीत जेष्ठ सभासदांच्या आग्रहास्तव सत्ताधारी उमेदवार निवडणूक रिंगणात; निवडणूकीने घेतले वळण

0
19
देवळा येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना समर्थ देवतांना जेष्ठ संस्थेचे सभासदआदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या देवळा येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारी केली असताना देखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने उद्या दोन-तीन दिवसावर मतदान येऊन ठेपले असताना संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी एकत्रित येऊन सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना आपण निवडणूक का लढवायची नाही असा जाब विचारून निवडणूक लढवण्यास अखेर भाग पाडले.

देवळा येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना समर्थ देवतांना जेष्ठ संस्थेचे सभासदआदी (छाया – सोमनाथ जगताप )

यात प्रत्येकाला वेगवेगळ्या निशाण्या मिळालेल्या असताना देखील ऐन वेळेस पॅनलची निर्मिती करून सभासदांच्या आग्रहाखातर उमेदवारीसाठी रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला एक वेगळेच वळण मिळाले आहे .येत्या रविवारी दि ८ जानेवारी रोजी आहेर पतसंस्थेची निवडणूक होऊ घातली आहे .या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर चांगले काम केले असताना देखील निवडणूक बिनविरोध होणे कामी विरोधकांनी आक्षेप घेतल्याने नैराश्यातून त्यांनी उमेदवारी केली असताना देखील पॅनलची निर्मिती न करता एक निशाणी पॅनलसाठी मागितली नाही व या निवडणुकीतून आपण बाहेर पडावे अशी सर्वांची भावना झाली .

यावेळी नव्याने निर्मिती केलेल्या पॅनलच्या उमेदवारांचा
प्रचाराचा जोर सुरू केला. यात सभासदांमध्ये गैरसमज पसरू लागला व सभासदांनी विचारणा केली की यामध्ये सत्ताधारी मधले अनुभवी लोक दिसत नाही . यासाठी ( दि ३ रोजी )ज्येष्ठ सभासदांनी एकत्रित येऊन काहीतरी भूमिका घ्यावी यासाठी येथील दुर्गा माता मंदिरात सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना बोलावून सांगितले की, मतदानाला अवधी जरी कमी असला तरी तुम्ही पॅनलची निर्मिती करा ,सर्व सभासद तुमच्या पाठीशी आहेत असे सांगत उमेदवारांना ऊर्जा दिली व उमेदवारी करण्यास भाग पाडले. यावेळी जेष्ठ सभासद कृष्णा बच्छाव, एल के निकम, हिरामण आहेर, पुंडलिक आहेर आदींनी भाषणे केली .

याप्रसंगी सत्ताधारी पॅनलने आपल्या उमेदवारांची ओळख करून नावे व निशाणी जाहीर केली. त्यात सर्वसाधारण गटातून विद्यमान चेअरमन पवन अंबादास अहिरराव, डॉ वसंतराव आहेर ,सुधाकर आहेर, दत्तात्रेय देवरे ,अरुण खरोटे ,सतीश राणे, विनोद शिंदे ,नितीन शेवाळकर, महिला राखीव गटातून दीप्ती धनंजय आहेर तर मेघा विजय आहेर ,अनुसूचित जमाती गटातून गोविंदा सोनवणे, भटक्या विमुक्त गटातून पंडित चंदन यांचा समावेश आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here