Deola News | देवळा येथे ‘उबाठा’ गटाची बैठक; अनेक तरुणांचा पक्ष प्रवेश

0
51

Deola News – सोमनाथ जगताप : देवळा | नाशिकनगरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाअधिवेशन होत आहे. पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा आयोजनसंदर्भात संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील विश्रामगृहात शिवसैनिकांची बैठक झाली. याप्रसंगी दिंडे यांच्या उपस्थितीत जवळजवळ वीस तरुणांनी पक्षात प्रवेश केला.

Deola | खर्डे येथील महेंद्र जाधव सीए परीक्षेत उत्तीर्ण

Deola News | २२ आणि २३ तारखेला उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर

येत्या २२ आणि २३ तारखेला उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असतील. काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन गोदाआरती करणार आहेत. २३ तारखेला हूतात्मा अनंत कान्हेरे मैदानात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या अधिवेशनाला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिंडे यांनी केले.

पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन आहेर तालुकाप्रमुख बापू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

Deola | देवळा येथे ‘नमो चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील पवार, सहसंपर्कप्रमुख विजय जगताप, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, उपशहर प्रमुख एस. के. शिंदे, नंदू जाधव, गोविंद सोनवणे, बाबाजी माळी, भास्कर अहिरे, विलास शिंदे, विजय आहेर, प्रशांत शेवाळे, गोरख गांगुर्डे, उपसरपंच सतीश बोरसे, खंडू जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी वीस जणांचा उबाठा गटात प्रवेश केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here