Deola | देवळा येथे महामार्गाच्या कामाविरोधात संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत काम बंद पाडले

0
98
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  भावडबारी घाट ते रामेश्वरफाटा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास तीन दिवसांपूर्वी पोलिस बंदोबस्तात सुरवात झाली असताना शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी (दि.१६) रोजी सकाळी १० वाजता ट्रॅक्टर व बैलगाड्या रस्त्यावर उभ्या आणून रास्ता रोको करत काम बंद पाडले. यामुळे काही वेळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती. आंदोलनस्थळी शिवसेनेचे (शिंदे गटाचे) संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी मध्यस्थी करून येत्या दोन दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत शेतकरी व संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावरील रस्त्याचे काम रेंगाळत पडल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाचे द्विगती रस्त्याचे काम सुरू असून ८ किमीचे एकेरी काम पूर्ण झाले असून, दुहेरी मार्गाचे पन्नास टक्के काम झाले आहे. गेल्या सहा महिन्यापासून या राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी आमच्या जमीनी मोजून द्याव्यात व त्यातील किती अधिग्रहण होणार आहे. याकामी संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्यात वारंवार वाद होऊन काम बंद ठेवण्यात आले आहे.

Deola | भावड घाट ते रामेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु; मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मोबदला नाही

एकेरी वाहतूक करत असताना बाजूच्या अर्धवट असलेल्या कामांवर सुमारे तीन फुटांपर्यंत खटकी असल्याने वाहनधारकांना ८ किमीपर्यंत जीव मुठीत घालून वाहन चालवावे लागते. यामुळे मोठा अपघात होऊन अनर्थ होण्याची शक्यता आहे असे असले तरी शेतकऱ्यांना आपल्या जमीनीच्या मोबदल्या बाबत स्पष्टता अद्याप होत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून काम बंद केले होते. मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग व संबंधित ठेकेदार यांनी पोलिस बंदोबस्तात सदरचे काम सुरू केले.

त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होऊन त्यांनी रास्ता रोको करत काम बंद केले. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी प्रत्यक्षात जागेवर येऊन संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांशी चर्चा केली. याकामी मार्ग काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत पालकमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात शेतकरी व अधिकारी, ठेकेदार यांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले व तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

यावेळी शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ, दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, चांदवडचे उप जिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे, मविप्र संचालक विजय पगार तालुका प्रमुख दीपक निकम आदींनी शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी संबंधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Deola | शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग अडवून केलं रास्ता रोको आंदोलन


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here