Deola | कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मतदान जनजागृती

0
16
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक अंतर्गत येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा एन.एस.एस. विभाग व देवळा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

Deola | पिंपळगाव येथील जनता विद्यालयात कर्मवीर डी. आर. भोसले यांना अभिवादन

महाविद्यालयातील नव मतदार स्वयंसेवकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित

‘लोकशाही अधिक बळकट व्हावी’ या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोग यांनी स्वीप उपक्रम सुरू केला असून त्या माध्यमातून मतदान जनजागृती केली जात आहे. महाविद्यालयातील नव मतदार स्वयंसेवकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून निवडणुकी संबंधीचे सर्वसामान्य प्रश्न विचारून अधिक मतदानासाठी मतदारांना उद्युक्त करावे. हे यामागील प्रयोजन होते. देवळा नगरपंचायतच्या वतीने प्रथम तीन विजेत्या गटातील स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच महाविद्यालय ते देवळा पाच कंदील परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

Deola | ‘गावागावातून मिळणारा प्रतिसाद बघता माझा विजय निश्चित’- केदा आहेरांनी व्यक्त केला विश्वास

या मंडळींनी दर्शवली उपस्थिती

यावेळी गटशिक्षणाधिकारी सतिष बच्छाव, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. एन. निकम, एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन भामरे ,डॉ. राकेश घोडे सह सर्व प्राध्यापक, देवळा नगरपंचायतचे लेखापाल नितीन भवर, लेखापरीक्षक जुगल घुगे, स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव, नगररचनाकार अपूर्वा डोळे, शहर समन्वयक दिग्विजय देवरे व स्पर्धक विद्यार्थी सर्व स्वयंसेवक उपस्थित हो ते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here