सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | वासोळ येथील मविप्र समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात सन २००७-०८ बँचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला. २००८ शालांत परीक्षा देऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी १६ वर्षानंतर एकत्र येत स्नेहमेळावा घेण्याची कल्पना ललिता पगार, सतिश जावरे, नितीन भामरे यांनी मांडली त्यास प्रतिसाद देत सर्व विद्यार्थ्यांनी दिपावलीचे औचित्य साधत एकत्र येऊन स्नेहमेळाव्यातुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Deola | गृहभेट मतदान प्रक्रियेअंतर्गत देवळा शहरात २५ पैकी २३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या शिक्षकांचा सत्कार केला
या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक के.एन.देवरे होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक एस.यु.शिर्के, ‘मविप्र’ सेवक सोसायटीचे संचालक मनिष बोरसे, वैशाली निकम, शामू कोकणी, संतोष ठाकरे, विक्रम बच्छाव, सरेश पवार, बाळू महिरे, माणिक देवरे, आदि आजी-माजी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करत सत्कार केला.
Deola | देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष स्व. अशोक आहेर यांच्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या
अध्यक्षीय मनोगतातुन देवरे यांनी शाळा विकासात विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. यावेळी शाळेतील जुन्या आठवणी उजाळा देत वर्षा आहिरे, अश्विनी सुर्यवंशी, विशाल आहिरे, जयश्री देसले, कल्पना बागुल, हर्षाली महाले, सतिश जावरे आदि माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करतांना मनिष बोरसे, श्रीमती वैशाली निकम, एस.एस. कोकणी यांनी स्नेह मेळावा आयोजकांचे कौतुक करत हा स्नेह वृद्धींत होत इतरांना प्रेरणादायी ठरावा तसेच शैक्षणिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतातुन देवरे यांनी शाळा विकासात विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. सूत्रसंचालन ललीता पगार, चेतन सुर्यवंशी, नितिन भामरे यांनी केले. तर आभार ललिता पगार हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम