Deola | देवळ्यात अवैधरित्या गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; 68 हजार 290 रुपयांचा अवैध साठा जप्त

0
45
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील लोहोणेर शिवारात शुक्रवारी दि. ११ रोजी देवळा पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळ गूळ व इतर साहित्य असा एकूण ६८ हजार २९० रुपये किमतीचा अवैध साठा जप्त केला असून, आरोपीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अवैधरित्या सर्रास उघड्यावर गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Deola | खर्डे येथे अटल भूजल योजनेचे ग्रामस्थारावरील प्रशिक्षण संपन्न

देवळ्यात गावठी दारूच्या साहित्याचा साठा

या बाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशानुसार, जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि. ११ रोजी देवळा तालुक्यातील लोहोणेर गाव शिवारात काही संशयीत हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य काळा गुळ व तुरटीचा मोठ्या प्रमाणावर अवैध साठा विनापरवाना कब्जात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणुक करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

पोलिसांकडून छापेमारी करत गुन्हा दाखल

त्यानुसार, पोलीसांनी याठिकाणी प्रदिप आनंदा बच्छाव, (वय ३८) यांच्या घरातील गोडाऊनमध्ये छापा टाकला असता हातभ‌ट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या काळा गुळाच्या एकुण २४५ भेल्या (२२०० किलो), तसेच १०७ किलो तुरटी असा एकुण ६८,२९०/- रूपये किंमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला. यातील इसम हा हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा वरील अवैध साठा विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने देवळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deola | खर्डे येथील इंदिरा गांधी विद्यालयात कै. पंडित धर्मा पाटील यांची जयंती साजरी

कारवाईने देवळा तालुक्यात खळबळ

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभीरे, पोहवा गिरीष निकुंभ, सुभाष चोपडा, शरद मोगल तसेच देवळा पोलीस ठाण्याचे हवालदार गवळी, कोरडे, पोलीस नाईक मोरे, चव्हाण यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. या कारवाईने देवळा तालुक्यात खळब उडाली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here