सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | पुणे येथे झालेल्या बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित सभापती, सचिवांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी दि. ७ रोजी देवळा बाजार समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ यांचे संयुक्त विद्यमाने (दि. 03)/ रोजी पुणे येथे राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती व सचिव यांचेशी संवाध साधुन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील बाजार समित्यांचे प्रतिनीधींनी त्यांच्या अडचणी अब्दुल सत्तार यांना सांगितल्या असता त्यांनी सदर परिषदेमध्ये राज्यातील बाजार समितीचे सभापती व सचिवांचा अपमान करुन त्याठिकाणी सर्वांशी गैरवर्तन केले होते.
Deola | केदा आहेरांसाठी गावं एकवटले…!
बाजार समिती संघाच्या वतीने सत्तारांचा निषेध
या प्रकाराबाबत राज्यातील बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने अब्दुल सत्तारांविरोधात निषेधाचा ठराव देखील करण्यात आला. सत्तार यांच्या गैरवागणुकीबद्दल निषेध म्हणुन राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी सोमवार( दि. 07) रोजी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंदमध्ये देवळा बाजार समितीने सहभाग नोंदवून कडकडीत बंद ठेऊन निषेध व्यक्त केल्याची माहिती सभापती योगेश आहेर ,उपसभापती शिवाजी आहिरे, सचिव माणिक निकम व संचालक मंडळाने दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम