Assembly Election Result | मालेगावात दादा भुसेंची मोठी आघाडी; सलग चार फेऱ्यांमध्ये आघाडीवर

0
55
#image_title

Assembly Election Result | विधानसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी सुरू झाली असून टपाली मतमोजणी महायुती आघाडीवर आहे. तर महायुतीत भाजप हा मोठा पक्ष ठरला असून महाविकास आघाडीत काँग्रेस आघाडीवर आहे. तर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली असून मविआ व महाविकास आघाडीत ‘कॉंटे की टक्कर’ पहायला मिळत आहे.

Vidhan Sabha Result | महायुतीत भाजप मोठा पक्ष!; नाशकात अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर

मालेगावात दादा भुसेंची मोठी आघाडी

नाशिक पूर्व मतदार संघातून भाजपचे राहुल ढिकले 3,600 मतांनी आघाडीवर आहेत. तर मालेगाव बाह्य मतदार संघातून दादा भुसे यांनी 4,000 मतांनी आघाडी घेतली आहे. नाशिक मध्य मतदार संघातील भाजपच्या देवयानी फरांदे 1,590 मतांनी आघाडीवर आहेत. तर येवला मतदार संघातून छगन भुजबळ मात्र पिछाडीवर गेले आहेत. तर नांदगाव मतदार संघात समीर भुजबळ पिछाडीवर असून शिंदे गटाचे सुहास कांदे आघाडीवर आहेत. तसेच चांदवड-देवळा मतदारसंघात अपक्ष उमेदवार केदा आहेर, नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजपच्या सीमा हिरे आघाडीवर आहेत.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर

दरम्यान, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत तर पोस्टल मतमोजणी पिछाडीवर असलेले अजित पवार बारामती मतदारसंघात अजित पवार आघाडीवर आहेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघात देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. तर माहीम मतदारसंघात महेश सामंत आघाडीवर आहेत.

Assembly Election | मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; इतक्या फेऱ्यांत होणार मतमोजणी

मालेगावात मतदानाच्या 5 फेऱ्या पूर्ण

* मशाल – 8799

* धनुष्यबाण – 31754

* रिक्षा – 9879

* आघाडी –  21875


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here