Assembly Election | विधानसभा निवडणूक 2024 साठी आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून या मतमोजणीसाठी 15 विधानसभा मतमोजणी केंद्रांवर 14 टेबलच्या माध्यमातून मोजणी केली जाणार आहे. दिंडोरी येथे कमी जागा असल्यामुळे 12 टेबलच्या माध्यमातून नोंदणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले आहे.
Assembly Election | नाशिक जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत एकूण किती टक्के मतदान?
‘या’ मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी लागणार
गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या तुलनेत सुमारे 69.2% जास्त मतदान झाल्यामुळे यावर्षी सर्वांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या सर्वात कमी फेऱ्या ह्या देवळाली व निफाड मतदार संघाच्या होणार असून त्यामुळे येथे निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक म्हणजेच 30 फेऱ्या होतील. त्यामुळे तेथील निकाल उशिरा लागण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सद्यस्थितीत स्ट्रॉंग रूम परिसर सील करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त राहणार आहे.
Assembly Election | नाशकात युती-आघाडीच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
दुपारी दोन पर्यंत चित्र स्पष्ट होणार
जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी मतमोजणी पार पडणार असून टपाली मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ईव्हीएम मधील मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर 4 अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. शिवाय प्रत्येक 7 टेबलसाठी 1 अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, टॅब्युलायजेशन पथक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी वर्ग असणार आहेत. दुपारी 2 पर्यंत सर्व मतदार संघाचा कल समजण्याची शक्यता आहे.
मतदारसंघ – फेऱ्या – ठिकाण
नांदगाव – 25 (नवीन तहसीलदार कार्यालय)
मालेगाव बाह्य – 26 (शासकीय वखार महामंडळ गोडाऊन)
कळवण 25 – (नवीन प्रशासकीय इमारत)
मालेगाव मध्य – 25 (छत्रपती शिवाजी जिमखाना, संगमेश्वर)
येवला – 24 (पैठणी क्लस्टर गोडाऊन)
बागलाण – 21 (पंडित धर्मा पाटील मराठा हायस्कूल हॉल )
सिन्नर – 25 (तहसील कार्यालय)
चांदवड – 22 (नवीन प्रशासकीय इमारत)
देवळाली – 20 (जिल्हा ईव्हीएम केंद्र पिंप्री सय्यद)
नाशिक पूर्व – 24 (विभागीय क्रीडा संकुल आडगाव नाका)
दिंडोरी – 27 (मविप्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय)
इगतपुरी – 22 (शासकीय कन्या विद्यालय नाशिक)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम