Vidhan Sabha Result | महायुतीत भाजप मोठा पक्ष!; नाशकात अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर

0
42
#image_title

Vidhan Sabha Result | विधानसभा निवडणूक 2024 साठी आज निकाल जाहीर होणार असून सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सर्वप्रथम पोस्टल मत मतांची मतमोजणी केली जाणार आहे. 8:30 वाजेपर्यंत पोस्टल मतमोजणी संपणार असून त्यानंतर EVM मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतमोजणीत महायुतीने आघाडी घेतली असून भाजप महायुतीतील मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडी काँग्रेस आघाडीवर आहे.

Assembly Election | मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; इतक्या फेऱ्यांत होणार मतमोजणी

नाशिक पोस्टल मतमोजणी कल

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3 मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर असून येवला मतदार संघात छगन भुजबळ, इगतपुरी मतदार संघात हिरामण खोसकर आणि दिंडोरी मतदार संघात नरहरी झिरवाळ आघाडीवर आहेत. त्याचबरोबर मालेगाव बाह्य मतदार संघात दादा भुसे आघाडीवर, निफाड मतदार संघात उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम, नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे, देवळाली मतदारसंघातून ठाकरे गटाचे योगेश घोलप, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here