सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा निवाणे बारी घाटमाथ्यावर पोल्ट्री फॉर्म व्यावसायिकांनी मृत कोंबड्या फेकून दिल्या असून, याठिकाणी याची दुर्गंधी पसरल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधितांनी याची तात्काळ दखल घेऊन, योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या परिसरात राहणारे शेतकरी विठोबा चव्हाण यांनी केली आहे.
माजी मंत्री स्व.ए.टी. पवार यांच्या विशेष प्रयत्नातून देवळा कळवण तालुक्यातील नागरिकांसाठी दळणवळणाची समस्या लक्ष्यात घेऊन तालुक्यातील मुलूख वाडी ते कळवण तालुक्यातील नावाने मार्गावर डोंगर फोडून घाट रस्ता तयार करून वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या निवाने बारी घाटात आजूबाजूचे पोल्ट्री फॉर्मधारक व्यावसायिक वारंवार मृत कोंबडया फेकून देत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून वाहन धारक करीत आहेत.
दर्गंधीमुळे वाहनचालकांना मनस्ताप
या घाटात फेकलेल्या मृत कोंबड्या मुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत तसेच, घाट परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
Deola | चांदवड-देवळा मतदारसंघात ३ लाख ८ हजार ८०८ मतदार; ३०६ केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडणार
योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
घाटात मृत कोंबड्या न फेकता पोल्ट्री धारकांनी आपल्या शेतातच खड्डा खोदून मृत कोंबड्यांची विल्हेवाट लाववावी अशी मागणी करण्यात आली आहे. या गंभीर समस्या कोणीही लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात असून, सबंधित यंत्रणेने याची दखल घेऊन, योग्य ती कारवाई करावी. अन्यथा घाट रस्ता बंद करून, आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेवटी विठोबा चव्हाण यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम