Deola | देवळ्यात उमेदवारांपेक्षा तालुक्यातील तीन युवा नेतृत्वांचीच चर्चा

0
32
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची सर्वत्र धूम सुरू असली तरी देवळा तालुक्यात मात्र फक्त प्रदेश पातळीवरच्या तीन युवा नेतृत्वांची चर्चा  आहे. एकेकाळी देवळा तालुका हा माजी मंत्री डाॅ. दौलतराव आहेर, माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांच्या नावाने जिल्ह्यासह राज्यभरात ओळखला जायचा. दरम्यान, अता या निवडणुकीत देवळा तालुक्यातील तीन युवा नेतृत्व राज्याच्या निवडणुकीत प्रदेशची महत्वाची पदं भूषवत आहेत. त्यामुळे देवळा तालुक्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारांपेक्षा यांचीच चर्चा जास्त आहे.(Deola)

NCP | उदयकुमार आहेरांवर राष्ट्रवादीच्या ‘प्रवक्ते’ पदाची जबाबदारी

यात देवळा तालुक्यातील लोहोणेर गावातील प्रविण अलई यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदी देवळा येथील उदयकुमार आहेर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच माळवाडी येथील शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या स्टार प्रचारक पदी निवड झाली.(Deola)

Ajit Pawar | शालिनीताईंचा मानसिक तोल ढासळला; उदयकुमार आहेरांचे प्रत्युत्तर

Deola | देवळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब

देवळ्यातील हे तिन्ही नेतृत्व सध्या राज्यभर आपापल्या पक्षाच्या भुमिका घेवून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरत आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात आपल्या भाषणांनी हे आपापल्या पक्षाची भुमिका मांडून आपली छाप पाडत आहेत.
त्यामुळे दिंडोरी आणि नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपेक्षा यांचीच सध्या तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या घरातील आणि ग्रामीण भागातील युवक हे राज्याच्या राजकीय व्यासपीठावर जाऊन आपल्या वक्तृत्वाची आणि नेतृत्वांची छाप पाडत असून, ही देवळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.(Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here