Deola | देवळा मेडिकल असोसिएशनच्या वतीने भाविकांसाठी मोफत औषधांचे वाटप

0
72
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चैत्र पौर्णिमा निमित्ताने सप्तश्रृंगी गडावर सुरू झालेल्या यात्रोत्सवासाठी खान्देशातील भाविक मोठ्या प्रमाणावर लोहोणेर-विठेवाडी मार्गे दर्शनासाठी जात असून, या भाविकांसाठी देवळा मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विठेवाडी येथे मोफत औषधे वाटप करण्यात येत आहेत. दरवर्षी चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरते. यानिमित्ताने देवीच्या दर्शनासाठी खान्देशातून मोठ्या प्रमाणावर भाविक भर उन्हात पायी चालत गडावर पोहचतात.

Deola | मयंक जाधव याची नवोदय विद्यालयासाठी निवड

सामाजिक बांधिलकी म्हणून या भाविकांसाठी वेळेवर औषधे उपचार मिळावे. यासाठी देवळा मेडिकल असोसिएशनच्या वतीने विठेवाडी येथे पेंडल उभारून मोफत औषधांचे वाटप करण्याचा शुभारंभ रविवारी (दि २१) रोजी करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष पंकज आहेर यांनी दिली. या उपक्रमाचे भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. यावेळी राजेंद्र निकम, महिंद्र आहेर, नंदलाल निकम, संदीप निकम, प्रवीण निकम, निंबा निकम, ईश्वर निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Deola | चांदवडचा शुभम बरकले केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here