सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत विविध विकास कामांसाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती चांदवड – देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. यात देवळा येथील दुर्गा माता मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे – 45.00 लक्ष, दुर्गा माता मंदिर देवळा येथे परिसर सुशोभीकरण करणे 25.00 लक्ष, देवळा येथील महादेव मंदिर परिसरात रिटनिंग वॉल बांधणे व अनुषंगिक कामे करणे – 85.00 लक्ष, देवळा येथील जुना मारुती मंदिर परिसरात सभामंडप व पेव्हारब्लॉक बसविणे 45.00 लक्ष अशा एकूण 2 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले. दरम्यान, या विकास कामांना निधी मंजूर झाल्याने देवळा शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम