सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहरात गेल्या 10 महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेला 31 मार्च अखेर 8 लाख, 04 हजार, 158 रू. इतका ढोबळ नफा झाल्याची माहिती
संस्थेचे संस्थापक चेअरमन पवन अंबादास अहिरराव यांनी दिली. या संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे; भागभांडवल – 23 लाख, 01 हजार, 800 रुपये, स्वनिधी – 7 लाख, 43 हजार, 872 रुपये, एकुण ठेवी – 3 कोटी, 30 लाख, 99 हजार, 226 रुपये, सुरक्षित गुंतवणूक – 1कोटी, 08 लाख, 81 हजार, 966 रुपये, एकुण कर्जवाटप – 2 कोटी, 51 लाख, 67 हजार, 301 रुपये तर शून्य टक्के थकबाकी आहे. ठेवीदार, सभासदांनी नव्याने स्थापना करण्यात आलेल्या या आर्थिक संस्थेवर विश्वास दाखवला असून, कर्जदारांनी वेळेत थकबाकी जमा केल्याने संस्थेने अल्पावधीत प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. पुढील काळात जास्तीत जास्त ठेवी जमा करून व्यावसायिकांना कर्ज वाटप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याची भावना संस्थापक चेअरमन पवन अहिरराव यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम