Deola | देवळा शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण

0
9
Deola
Deola

देवळा | छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान आणि औरंगजेबाविरूद्ध लढताना केलेला पराक्रम, त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण जिवंत ठेवण्यासाठी शनिवारी (दि.१५) रोजी सायंकाळी येथील छत्रपती शिवस्मारक उद्यानात केदा नाना आहेर मित्र मंडळ व स्मारक समितीच्या संकल्पनेतून शालेय व देवळा शहर व पंचक्रोशीतील नागरिकांना ‘छावा चित्रपट’ मोफत दाखविण्यात आला. चित्रपट सुरू होण्यापूर्वी नगरसेवक संभाजी आहेर, योगेश उर्फ नानु आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, हर्षद भामरे, मनु आहेर, सनी मोरे, चेतन आहेर आदींच्या हस्ते शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. चित्रपट बघताना महिलांच्या डोळ्यातून ही आश्रू अनावर झाले. बहुतांश विद्यार्थी व नागरिकांनी या चित्रपटाचा लाभ घेतला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here