सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील कणकापूर येथे रविवारी दि. १६ रोजी भरदिवसा अज्ञात चोरट्याने शेतमजुराच्या घरातून वीस हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची खबर पोलिस पाटील दौलत जैन यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी याची कसून चौकशी करून चोरट्याला जेरबंद करावे, अशी मागणी उपसरपंच जगदीश शिंदे यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कणकापूर येथील शेतमजूर दादाजी देवराम बर्डे हे येथे भाड्याच्या घरात राहत असून, ते वाट्याने जमीन कसतात. त्यांनी गेल्या आठवड्यात कांदे विकले होते. यातून आलेले वीस हजार रुपये त्यांनी घरात ठेवले होते.
Deola | देवळा शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण
बर्डे यांच्या पत्नी रविवारी दि.१६ रोजी सकाळी शेतात गेल्या होत्या व पती देवळ्याला आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आले होते. घराला कुलूप लावले असताना अज्ञात चोरट्याने भरदिवसा दरवाज्याचा बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात डब्यात ठेवलेले वीस हजार रुपये चोरून नेले. या घटनेची माहिती बर्डे यांनी उपसरपंच जगदीश शिंदे यांना दिल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील जैन यांना दिल्यानंतर त्यांनी याची खबर देवळा पोलीस ठाण्यात दिली. बर्डे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भर दिवसा गावात चोरी झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून, पोलिसांनी याची कसून चौकशी करून या भुरट्या चोराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी योगेश गांगुर्डे, वैभव जगताप आदींनी केली आहे. यावेळी संजय जैन ही उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम