सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु असून, येथे ज्येष्ठ लेखक व विचारवंत संजय सोनावणी यांच्या “THE ASTRONAUT.. WHO CRASHED IN FROM SPACE” या पुस्तकाचे प्रकाशन देवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता उदयकुमार आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दांडगा अनुभव असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील देवळा सारख्या ग्रामीण भागातील राज्यपातळीवर काम करणारे करणारे उदयकुमार आहेर यांच्या हस्ते दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ विचारवंतांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने ग्रामीण भागासह जिल्हा जिल्हाभरातून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून आहेर यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी डॉ. अमोल देवळेकर, चित्रपट निर्माते निलेश नवलखा, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. संजय सोनावणी यांचे हे 126 वे पुस्तक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम