सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा बाजार समितीच्या मुख्य आवारात आज गुरुवारी दि. ६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने उभ्या असलेल्या कारची काच फोडून रोकड हडप करण्याचा प्रयत्न केला. रोकड हाती न लागल्याने चोरट्याने क्षणार्धात पळ काढला. याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळा बाजार समितीच्या मुख्य यार्डात सकाळच्या सत्रात भुसार मालाचा लिलाव भरतो. गुरुवारी दि. ६ रोजी तालुक्यातील हनुमंत पाडा येथील मक्याचे व्यापारी ललित देविदास जाधव हे शेतकऱ्यांना देण्यासाठी मार्केट कमिटीच्या व्यापारी गाळ्यांमध्ये असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चार लाख रुपये घेऊन आपल्या कार (हॅरीअर क्रमांक एम एच 41 बी आर 4141) मध्ये ठेऊन लिलावाच्या ठिकाणी नजीकच कार उभी करून लिलावात गेले असता अज्ञात चोरट्याने पाळत ठेवत असलेल्या कारची पुढील दरवाजाच्या डाव्या बाजूची काच फोडून रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला.
Deola | देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल
मात्र सदर रक्कम चोरट्याच्या हाती न लागल्याने त्याने क्षणार्धात या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेने व्यापारी वर्गात धास्ती भरली आहे. देवळा बाजार समितीमध्ये कांदा तसेच भुसार मालाचे रोख पेमेंट केले जात असल्याने अज्ञात चोरटे पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी बाजार समितीच्या आवारात देखील फेरफटका मारावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसून व्यापारी व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम