Igatpuri | टाकेद येथे शेतकरी नोंदणी महाशिबिर संपन्न; शेकडो शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग

0
14
Igatpuri
Igatpuri

Igatpuri |   सर्वतीर्थ टाकेद येथे भव्य शेतकरी नोंदणी कार्ड महाशीबिराचे आयोजन मंगळवार (दि.४) फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. पीक विमा व इतर कृषी योजनांसाठी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभ पारदर्शक पध्दतीने वेळेत उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पीएम किसान योजनेचे अनुदान, उच्च गुणवत्तेची कृषी निष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून प्रत्येक शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदणी करवयाची आहे. ही नोंदणी केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळणार आहे. तलाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्यात येणार आहे.

सामहिक खातेदार शेतकरी असल्यास प्रत्येक सामाहिक शेतकऱ्यांची नोंदणी करावी, टाकेद येथे होणाऱ्या कॅम्पमध्ये सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आधार, पॅनकार्ड, बँक खात्याचा तपशील, आधार संलग्न मोबाईल घेऊन निशुल्क आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा असे आवाहन तहसीलदार अभिजित बारावकर यांनी या महाशिबिरात उपस्थित शेतकरी बांधवांना केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व प्रामाणिकपणे पोहचविता यावा व कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ऍग्रिस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अग्रीकल्चर योजना राज्यात राबविण्यात येत आहे.) मंगळवार दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी टाकेद येथील राम मंदिरात (सांस्कृतिक भवन) जिल्हा परिषद शाळेसमोर टाकेद गावात सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भव्य शेतकरी नोंदणी महाशिबिराचे आयोजन केले होते.

Igatpuri | छत्रपती शिक्षण मंडळाकडून टाकेद कातकरी वस्तीतील कुटुंबांची दिवाळी गोड

या शिबिरात टाकेद गटातील जवळपास दहा सेतू संचालक व एक आधार कार्ड संचालक आपल्या संगणक किट साहित्यासह उपस्थित होते. यासोबतच प्रत्येक ठिकाणी टेबल लावून तहसीलदार, नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व कृषिसहाय्यक, सर्व ग्रामसेवक प्रत्येक टेबलवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना थेट सर्व अडचणी सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमसंदर्भात तहसीलदार श्री बारावकर यांनी टाकेद गट व परिसरातील तालुका प्रशासनाला आदेश काढून सूचना निर्गमित केल्या होत्या. या शासकीय कार्यक्रमात इगतपुरी तहसीलचे संयोगा नायब तहसीलदार विजय भंडारे, अवल्ल कारकून महेश कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या पाठपुराव्याने मंजूर असलेल्या संजय गांधी निराधार, जेष्ठ वयोवृद्ध नागरिक, विधवा परीतक्त्या महिला, अपंग बांधव यांना तहसीलदार अभिजित बारावकर यांच्या हस्ते संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले आहे.

तरी या भव्य शेतकरी नोंदणी महाशीबिराला टाकेद व परिसरातील शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली जवळपास पाचशेच्या वर शेतकऱ्यांची या महाशिबिरात नोंदणी करण्यात आली असल्याचे सर्व उपस्थित सेतू संचालकांनी सांगितले.  उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी आपापले कार्ड नोंदणी करून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार अभिजित बारावकर, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, यांच्यासह तालुका प्रशासनाने केले आहे. या कार्यक्रमाला व्यासपीठावर तहसीलदार अभिजित बारावकर, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, जेष्ठ नागरिक भास्कर महाले, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, जेष्ठ शिक्षक बाळूसिंग परदेशी, निवृत्ती आगीवले, मंडळ अधिकारी रुपाली सावळे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, तलाठी सचिन कराते, वर्षा देशमुख, सारिका रोकडे, ग्रामसेवक विजय रासकर, कृषिसहाय्यक जयश्री गांगुर्डे, विजय कापसे, रमेष वाडेकर, दीपा शिंदे, वंदना शिंगाडे, चेतना चव्हाण, शांताराम गभाले, नेहा चौधरी आदींसह बहुसंख्य शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या महाशिबिराला नवनाथ आव्हाड, दिलीप बांबळे, सागर दवंडे, गणेश वाजे, धनराज काळे, सुहास सोनवणे, महेंद्र खाडे आदी सेतू संचालक उपस्थित होते.

“शासनाच्या विविधांगी योजनांसाठी शेतकरी डिजिटल कार्ड आवश्यक असून या कार्ड व्यतिरिक्त कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही योजनांचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आजच शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी करून घ्यावी.”
– अभिजित बारावकर, तहसीलदार इगतपुरी

“केंद्र व राज्य सरकारच्या कृषी व ग्रामविकास मंत्रालयाच्या ध्येयधोरण उपक्रमांतर्गत देशातील सर्वच शेतकऱ्यांना शासकीय योजनांसाठी शेतकरी नोंदणी करणे आवश्यक असून टाकेद व परिसरातील शेतकऱ्यांनी स्थानिक सेतू कार्यालयात जाऊन आजच आपली नोंदणी करून घ्यावी.
– राम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here