सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून महिलांसाठी शिवण व कर्तन प्रशिक्षण आयोजित केले असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अर्जुन मोहन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात पन्नास महिलांना मोफत शिवण व कर्तन प्रशिक्षण खर्डे ग्रामपंचायत व संघर्ष समाज विकास मंडळ यांच्यामार्फत पंधरा दिवस देण्यात येणार आहे. यावेळी प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या महिलांना संघर्ष समाज विकास मंडळाकडून कातर, टेप, दोरा, एक मीटर कापड, हात शिलाई व मशीनची सुई, बॉबीन, वाचन साहित्य देण्यात आले.
Deola | चनकापूर धरणातून उजव्या कालव्याला आवर्तन सोडावे; शिवसेनेची मागणी
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच भाग्यश्री पवार, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल देवरे, व्हा. चेअरमन युवराज मोरे, संचालक वसंत जाधव, कारभारी जाधव, माधव ठोंबरे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनील जाधव आदींसह जितेंद्र पवार, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, बचत गटाच्या सिआरपी मनीषा निकम, प्रशिक्षिका नीलेशा पगारे आदींसह विकास सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामपंचायत सदस्य व महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संघर्ष समाज विकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू शेवाळे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम