सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गडचिरोली येथे फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी देवळा येथील आहेर महाविद्यालयाचा संघ सहभागी होत असून, यासाठी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, संस्थेच्या सचिव प्रो डॉ. मालती आहेर यांनी या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा १९ वर्ष मुले व मुली स्पर्धा चार्मोर्शी (ता.चार्मोर्शी जि. गडचिरोली) येथे दि ४ ते ६ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचा १९ वर्षाखालील मुले व मुलीचा संघ गडचिरोली येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी सहभागी होत आहे.
Deola | अभिनव व जनता विद्यालयात विविध उपक्रमांनी मराठी पंधरवाडा सोहळ्याची सांगता
मुलांमध्ये अजय जाधव, प्रमोद गवळी, प्रथमेश गाढे, चैतन्य शिरसाट, गौरव अहिरे, वेदांत निकम, केदा शीलावंत, यश पगार, निखिल जगदाळे, ओम भामरे तर मुलींमध्ये ललिता कदम, अस्मिता शिरसाट, जागृती आहिरे, मोहिनी वाघ, पुनम वाघ, दुर्गेश्वरी आहिरे, ईश्वरी सोनवणे, भूमिका गांगुर्डे स्पर्धेसाठी सहभागी होत आहे. यासाठी देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, संस्थेच्या सचिव प्रा. डॉ. मालती आहेर, प्रशासकीय अधिकारी बी.के. रौंदळ, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाने, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. एन.निकम, डॉ. बनसोडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.पी.एन.ठाकरे, प्रा. तुषार देवरे, प्रा. किरण भामरे यांनी विजयी संघांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम