सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मराठी भाषा समृद्ध असून साहित्य, लोकसंस्कृती आणि बोलींनी मराठीची व्याप्ती विस्तृत झाली आहे. मराठी लोकसंस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने देवळा येथील अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला. १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यातंर्गत विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन मुख्याध्यापक मनीष बोरसे यांनी केले.
यात काव्य गायन, मराठी भाषिक खेळ, मराठी गीतांचे गायन, मराठी विषयाशी संबंधित प्रश्नमंजुषा, नाट्य सादरीकरण, मराठीतील संवाद, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. काव्य गायनात धनश्री पवार, प्राची गवारे, सायली पवार, अनुष्का सोनवणे यांनी तर नाटिका सादरीकरणात प्रांजल पाटील, क्रांती आहेर, आशावरी पवार, सायली शिंदे, यांना समृद्धी निकम, प्राची पवार या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. तसेच ईश्वरी आहेर, वेदिका पवार, तेजस दिवटे या विद्यार्थ्यांनी मराठी संवाद सादर केले. जागृती देवरे, राशी पवार या विद्यार्थिनींनी शब्दकोडे, प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसमोर सादर केल्यात.
Deola | निंबोळा येथील माध्यमिक विद्यालयात गोदा भूषण पुरस्काराचे वितरण
वकृत्वात तृप्ती निकम, ऋतुंबरा गुरगुडे यांनी आपल्या मनोगतातून मराठी विषयाचे जीवनातील महत्त्व विशद केले. अशाच पद्धतीने सदर पंधरवड्यात वर्ग स्तरावर भाषिक खेळही घेण्यात आले. सदर पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख निवृत्ती रौंदळ श्रीमती पुनम पाटील, शितल बिरारी, योगिता भामरे आदि शिक्षकांचे सहकार्य लाभले. पंधरवड्याच्या समारोपा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मनिष बोरसे यांनी मराठी भाषेचे महत्व सांगत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच उपशिक्षक निवृत्ती रौंदळ यांनी सर्वांचे आभार मानून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम