सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब आहेर यांच्या 31 व्या स्मृती सप्ताह निमित्त विद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ मालती आहेर ह्या उपस्थित होत्या. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. संस्थेतील विविध शाखेत कर्मवीर अण्णासाहेब यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याचा प्रचार व प्रसार करणे तसेच नव्या पिढीला समाजसेवेचे महत्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देणे हा ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी डॉ. मालती आहेर यांनी सांगितले.
Deola | आ. राहुल आहेर यांच्या हस्ते देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
सदर वकृत्व स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दिलेल्या विषयावर आपले प्रभावी असे वकृत्व सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगी असलेले विविध गुण दाखवण्यासाठी स्मृती सप्ताहाच्या निमित्ताने एक संधी चालून आलेली आहे आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपले कलागुण दाखवावेत व त्याद्वारे आपले जीवन यशस्वी करावे. तसेच माझा विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न हवा ही आण्णांची एक तळमळ होती. ती विद्यार्थ्यांनी साध्य करून विद्यालयाचे व संस्थेचे नाव उज्वल करावे असे विचार याप्रसंगी मुख्याध्यापक संजय पगार यांनी मांडले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख देविदास भदाणे यांनी केले. वकृत्व स्पर्धेचे परीक्षण सुमन आहेर, श्रीमती मेघा पवार यांनी केले. आभार योगेश गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम