Deola | राष्ट्रीय जयंती उत्सव समिती (वंजारी समाज) महाराष्ट्र राज्य या मान्यता प्राप्त संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी कनकापूर ता.देवळा येथील विलास भिलाची जैन यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. एकनाथराव ढाकाणे यांनी जैन यांना नुकतेच नियुक्ती पत्र दिले आहे. नूतन विभागीय अध्यक्ष विलास जैन यांची सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे.
Deola | पिंपळगाव विद्यालयात कर्मवीर अॅड. विठ्ठलराव हांडे यांना अभिवादन
यापुढे आपण राष्ट्रसंत भगवान बाबा, संत वामनभाऊ, आवजीनाथ बाबा, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांचे विचार सर्वसामान्य समाजापर्यंत पोहचवणे व वंजारी समाजामध्ये वेगवेगळ्या पातळीवर समाज प्रबोधन, उत्कर्ष या बाबींवर कार्य करणार असल्याची भावना जैन यांनी व्यक्त केली. त्यांच्या निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत गुघे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप, राष्ट्रीय खजिनदार तुकाराम सांगळे, आमदार नितीन पवार, आमदार डॉ. राहुल आहेर आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम