Rahul Aher | चांदवड-देवळा मतदारसंघातील सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी आ. आहेर सरसावले

0
28
Rahul Aher
Rahul Aher

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  चांदवड-देवळा मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आज मंगळवारी दि.१७ रोजी नागपूर येथे जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन चर्चा केली. पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून देवळा व चांदवड तालुक्यातील जनतेला सिंचनासाठी पाणी कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकते याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा खर्डे परिसरातील नागरिकांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आ. डॉ. आहेरांकडे केली आहे.

Rahul Aher | कांदा निर्यात शुल्क रद्द करावे; आ. डॉ. राहुल आहेर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

या परिसरासाठी हा प्रकल्प वरदान ठरू शकतो. याबाबत नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, मंत्रालयातील मुख्य अभियंता प्रसाद नार्वेकर, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, अधिक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे यांच्या उपस्थितीत पार गोदावरी लिंक या प्रकल्पावरील कामासंदर्भात बैठक संपन्न झाली. यावर सकारात्मक चर्चा झाली असून हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here