सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | पिंपळगाव (वा.) येथील मविप्रच्या जनता विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देवळा रोटरी क्लबच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमास मविप्र चे संचालक विजय पगार, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष एन.डी.पाटील, दिलीप पाटील, सरपंच जमनाबाई जाधव, उपसरपंच नदीश थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता परदेशी, राहुल वाघ, केशव थोरात, दिनेश पाटील, प्रकाश पाटील, भीमराव सावकार, दौलत खैरनार, विजय वाघ, विनायक वाघ, प्रवीण पाटील, नंदू वाघ, संजय कदम, विश्वास पाटील, रमेश सोनजे, माणिक सोनजे, विलास सोनजे, आदीसह पालक, ग्रामस्थ, प्राचार्या श्रीम.एस. एम.आहेर, पर्यवेक्षक देसले आर. एच. आदी उपस्थित होते.
प्राचार्य श्रीम.एस. एम.आहेर यांनी प्रास्तविक केले. एन.डी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर स्काऊट गाईडचे ध्वजाचे ध्वजारोहण दौलत खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘रोटरी क्लब ऑफ देवळा’ टाऊनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकली चे वाटप करण्यात आले.यावेळी रोटरीचे अध्यक्ष एस.टी.पाटील, सचिव राकेश शिंदे, डॉ. वसंतराव आहेर, अरुण पवार, विलास सोनजे, माणिक सोनजे, रमेश सोनजे, विकास सोसायटीच्या चेअरमन नर्मदाबाई खैरनार उपस्थित होते.
Nashik | येवला उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ‘ट्रामा केअर सेंटर’ला मंजुरी
एकलव्य संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब बागुल यांनी एस.टी. प्रजातीच्या विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटप केले. सेवानिवृत्त प्राचार्य जी.एम.वायकर यांनी विद्यालयास १२ डेस्क भेट दिले. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख रविंद्र निकम, अशोक खैरनार यांनी केले तर सी.डी.चव्हाण यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम