Deola | खर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हा. चेअरमन पदी युवराज बाबुराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते व्हा. चेअरमन उत्तम भिका थोरात यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी चेअरमन अनिल देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते युवराज मोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन व्हा चेअरमन मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजी जल्लोष केला. याप्रसंगी माजी चेअरमन रामदास गांगुर्डे, संचालक सौ. दिपाली जाधव, उत्तम थोरात, भरत देवरे, वसंत जाधव, सचिव विजय शिंदे आदींसह सभासद उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम