Deola | खाजगी बाजार सहकारी महासंघाच्या राज्य उपसभापती पदी सुनील आहेर यांची निवड

0
12
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महाराष्ट्र शासन पणन संचालनालय स्थापित महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार सहकारी महासंघाची सभा मंगळवारी दि. १० रोजी नाशिक येथे परफेक्ट कृषी मार्केट मध्ये मुख्य प्रवर्तक दुष्यंत कराड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत देवळा येथील सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटचे चेअरमन सुनील आहेर यांची खाजगी बाजार सहकारी महासंघाच्या राज्य उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Deola | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर यांच्या हाती ‘तुतारी’

निवडणूक निर्णय अधिकारी मम्हणून महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाचे सहकार अधिकारी दौंड उपस्थित होते.
देवळा येथील सुनील उर्फ गोटू आबा आहेर यांनी गेल्या वर्षी त्यांच्या नावाने खाजगी कृषी मार्केटची स्थापन केली आहे. या मार्केटला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने या खाजगी बाजार समितीने अल्प काळात शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर याठिकाणी कांदा, भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत आहेत. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, रोख पेमेंट देखील मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Chandwad-Deola | देवळ्याचा चौथा भिडू विधानसभेच्या मैदानात

या मार्केटचे अध्यक्ष सुनील आहेर यांची सहकारी राज्य महासंघाच्या उपसभापती पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.
विशेष उल्लेखनीय कै.यशवंतराव चव्हाण यांनी १९७० मध्ये सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संघाची स्थापना केल्यानंतर प्रथमच राज्य खाजगी बाजार सहकारी महासंघाची स्थापना करण्यात आली. यावेळी सुमंत कराड, सुरेश नाना पवार, सतीश पाटील, बापूराव पिंगळे, विठ्ठल वाडगे, शशिकांत वाबळे, दत्तात्रेय गोंदणे, हेमंत सानप, प्रताप महाले, सरिता मनोज चौधरी यांचे सह महाराष्ट्रातील खाजगी मार्केटचे संचालक उपस्थित होते. आहेर यांच्या निवडीचे कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसह सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here