Deola | शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी नोंदणी करावी; तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांचे आवाहन

0
16
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  ई-पीक पाहणी नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत असून या डिजीटल क्रॉप सर्वेक्षण महोत्सवात तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व तात्काळ मोबाईल द्वारे इ पीक पहाणीची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. शासनाने ई-पीक पाहणी नोंदवण्यासाठी अंतिम मुदत 15 सप्टेंबर पर्यंत दिली आहे. परंतु या मुदतीपर्यंतची वाट न पाहता लागलीच पीक पाहणी करून घ्यावी. ई- पीक पाहणी विहीत मुदतीत न नोंदविल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

Deola | कणकापूर ग्रामपंचायतीला भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेत वीस लाखाचे पारितोषिक

यात चालु (2024-25) वर्षाचा 7/12 निघणार नाही, कर्ज प्रकरण करता येणार नाही, पीक विमा मिळणार नाही, 7/12 क्षेत्र पडीक दिसेल, 7/12 निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही, खरेदी विक्रीसाठी अडचण येईल, अनुदानासाठी अडचण येईल, भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे ई-पंचनामे होणार नाहीत. याचा विचार करून तात्काळ ई पीक पाहणी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषीसहायक, कोतवाल, पोलीस पाटील, सेतु संचालक, स्वस्थ धान्य दुकानदार, यांची मदत घेवुन त्वरित ई-पीक पाहणी मोबाइल‌द्वारे नोंदवून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here