सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज रविवारी दि.८ रोजी देवळा बाजार समितीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील हे होते. तर राज्य समन्वयक कुबेर जाधव, कर्जमुक्ती सल्लागार सुधाकर मोगल, जिल्हा बँक कर्जमुक्ती आंदोलनाचे प्रणेते भगवान बोराडे, आदिवासी सहकारी संस्थेचे अध्यक्ष कैलास बोरसे, जिल्हा युवा अध्यक्ष तुषार शिरसाठ, वसाका उस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, आदींनी जिल्हा बँकेचे थकित कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित विभागाने सक्तीची वसुली सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव सुरू केले आहेत. ते थांबवण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असे कर्जमुक्ती सल्लागार सुधाकर मोगल यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर एक दोन दिवस ठिय्या मांडला असता तर नक्कीच काहीतरी तोडगा निघाला असता. परंतु संघटनेच्या नेत्यांनी घाई करुन, राजकीय नेत्यांच्या आश्वासनाला बळी पडून ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्यामुळे मोठं नुकसान झाले आहे. निवृत्ती गारे यांनी जिल्हा बँकेसंदर्भात माजी खासदार राजु शेट्टी यांनी वेळोवेळी सातत्याने शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. या जिल्हास्तरीय बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Deola | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी अशोक शेवाळे यांची निवड
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करणे, शेतीला दिवसा वीजपुरवठा करणे, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे, पीकविमा निकषात बदल करणे, कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णतः उठवून शासनाकडून वेळोवेळी भाव पाडले जातात तो हस्तक्षेप बंद करणे, कसमदेचा अंत्यंतचा जिव्हाळ्याचा तसेच पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला वसाका बंद आहे. बंद अवस्थेतील वसाका भाडेतत्त्वावर चालू करावा अथवा सभासदांनी एकत्र येऊन तो सुरू करण्यात यावा, नाशिक जिल्हा बँकेला शासनाकडून मदत मिळून थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करुन दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज मिळावी, पिक विम्याची भरपाई तात्काळ मिळावी, इत्यादी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. या जिल्हा बैठकीसाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुधाकर मोगल, भाई दादाजी पाटील, संजय जाधव, दगाजी आहीरे, रमेश आहीरे, गणेश चांदोरे, रविंद्र शेवाळे, अशोक शेवाळे, नवनियुक्त स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश आढाव, दिनकर उशिरे, भाऊसाहेब बोरसे, वैभव आहेर, वसंत वाघ, माणिक निकम, रामकृष्ण जाधव, संजय जाधव, भाऊसाहेब तासकर, गजानन घोटेकर, प्रसाद देवरे, बापु देशमुख, लक्ष्मण मोरे, रामदास निकम, दिपक पवार, कैलास कोकरे, कैलास बोरसे, कृष्णा जाधव, विपुल भामरे, समाधान आढाव, आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तुषार सिरसाठ यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम