सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | जुनी पेन्शन योजना सुरु करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि.२९) पासून बेमुदत संप पुकारला असून, या संपात देवळा नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांनी केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपंचातीच्या कार्यालयासमोर मागण्यांचे पोस्टर झळकावत आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (नवीन) तात्काळ अंमलबजावणी करणे.
Deola | बालाजी पतसंस्थेने जिंकली नागरिकांची विश्वासार्हता; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींनी केले कौतुक
तसेच नगरपरिषद /नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद/ नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मुलभूत समस्या व मागण्यांवर कार्यवाही करणे. तसेच महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायती मधील राज्य संवर्ग ३,००० अधिकारी व स्थानिक ६०,००० वर कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने (दि.२९) ऑगस्टपासून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद संवर्ग अधिकारी/कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून, या संपात देवळा नगरपंचायतीचे संवर्ग अधिकारी आशिष महाजन, जुगल घुगे, नितीन भवर, जनार्दन येवले, सुयोग पाचपाटील, अजय बच्छाव आदींनी आपला सहभाग नोंदविला असून, सदर संपास मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी देखिल जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम