सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील जिजामाता कन्या विद्यालयातील गुणवंत व यशवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा गुरुवार (दि.२०) रोजी झाला. संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ.मालती आहेर, प्रशासकीय अधिकारी बी.के.रौदळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सूर्यवंशी, मुख्याध्यापिका प्रतिभा सागर, पर्यवेक्षक कौतिक खोंडे आदी उपस्थित होते.
Deola | वैभव पवार उत्कृष्ट कुक्कुटपालक व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित
दहावी परीक्षेत विशेष यश मिळवणारे हार्दिक खैरनार (९६.६०%), कार्तिकी जोशी (९६.६०%), श्रावणी शेवाळे, (९६.४० %), जान्हवी ठाकरे (९६.२०%), आदिती आहेर (९५.८०%), प्रतीक्षा वाघ (९५.८०%), ईश्वरी बोरसे (९५.६०%) या गुणवंत विद्यार्थिनींचा पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात देवळा तालुक्यातून जिजामाता कन्या विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावल्यामुळे संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक के.एम. खोंडे यांनी तर सूत्रसंचालन एस.एन.आहेर यांनी केले. आभार प्रदर्शन एस.टी.पाटील यांनी केले .यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
Deola | विद्यार्थ्यांना गाडीतून मिरवत मेशी येथे शाळा प्रवेशोत्सव..
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम