सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहर व तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी लक्ष्मी नारायणच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याची पूजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. वटपौर्णिमा निमित्ताने देवळा शहरात मुंजोबा पारावर असलेल्या वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
Deola | जिजामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा संपन्न
तालुक्यातील लहान मोठ्या गावांत महिलांची सकाळपासून मिळेल त्या ठिकाणी वटवृक्ष शोधून त्याची पूजा करण्यासाठी लगबग दिसून आली. मोठ्या उत्साहात हा वटपौर्णिमा साजरी झाली. देवळा येथे पूजेचे पौरोहित्य राहुल वाघमारे यांनी केले. यावर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. यंदा पाऊस चांगला पडू दे यासाठी देखील महिलांनी यानिमित्ताने शंभू महादेवाकडे साकडे घातले. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात. यामुळे बाजारात फराळाचे साहित्य तसेच पूजा विधीसाठी आंबे घेण्यासाठीही गर्दी दिसून आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम