Deola | देवळा तालुक्यात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0
49
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  चिंचवे (ता. देवळा) येथील एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनिता जयराम माळी (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून आत्महत्येचे (suicide) कारण समजू शकले नाही. पोलिसांनी सांगितले की सदर विवाहिता मंगळवार (दि.१८) जुन रोजी पाच वाजेच्या दरम्यान हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. (Deola crime news)

तर (दि.१९) जुन रोजी सकाळी चिंचवे येथील रमेश कस्तूरचंद काला यांच्या गट नंबर दोन अ मधील विहीरीवर या महिलेची चप्पल आढळून आल्याने सदर घटनेची माहीती देवळा पोलिसांत कळवली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुजर, पोलीस नाईक नितीन बारहाते, पोलीस हवालदार समाधान खुरसणे, योगेश जामदार, महिला पोलीस माधुरी पवार, स्वाती चव्हाण घटनेस्थळी पोहचले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने लोहोणेरवरुन दिलीप पैलवान या पट्टीच्या पोहणाऱ्याला बोलवून विहिरीत जवळपास तीन तास शोध मोहीम राबविली. मात्र त्या ठिकाणी काहीही आढळून आले नाही.

Deola | जिजामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा संपन्न

मात्र गुरुवार (दि.२०) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुनिता माळी यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावरती तरंगताना आढळून आल्याने सदर घटना देवळा पोलिसांना कळवताच देवळा पोलीस नितीन बारहाते, योगेश जामदार घटनास्थळी पोहचले व विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृत सुनिता माळी यांना एक लहान मुलगा, तीन मुली असुन या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here