Deola MSCB: देवळा उपविभागात नऊ गावांची घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची वीजबिल थकबाकी शून्य

0
6
देवळा : महावितरण कंपनीच्या देवळा उपविभागात वीजबिल थकबाकी शून्य केली म्हणून खुंटेवाडी येथील वीज कर्मचारी गुलाब आहेर व निलेश भामरे यांचा सन्मान करताना उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे आदी (छाया - सोमनाथ जगताप)

Deola MSCB : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देवळा उपविभागात नऊ गावांची घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची वीजबिल थकबाकी शून्य केल्याने सदर गावातील वीज कर्मचाऱ्यांचा खास कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

देवळा महावितरण कंपनीच्या देवळा उपविभागात वीजबिल थकबाकी शून्य केली म्हणून खुंटेवाडी येथील वीज कर्मचारी गुलाब आहेर व निलेश भामरे यांचा सन्मान करताना उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे आदी छाया सोमनाथ जगताप

Malegaon sabha: ठाकरे आले आबांना मर्द म्हणाले, कांदेना टोला लगावला, गांधींना इशारा, भुसेंना दिलासा

वीजबिल वसुली करणे हे तसे अवघड काम परंतु सेवा आणि जनजागृती करत या नऊ गावातील वीज कर्मचाऱ्यांनी थकबाकी शून्य करण्यात यश मिळवले. देवळा उपविभागातील या नऊ गावांमध्ये खुंटेवाडी, खडकतळे, पिंपळगाव (वा.), वाखारवाडी, विजयनगर, कणकापूर, विठेवाडी, ठेंगोडा, बगडू या गावांचा समावेश आहे. (Deola MSCB)

या गावांमध्ये कार्यरत असलेले वीज कर्मचारी, तंत्रज्ञ व बाह्यस्रोत कर्मचारी गुलाब आहेर, निलेश भामरे, राकेश चव्हाण, सागर आहेर, अमोल वाघ, चेतन भामरे, प्रवीण पवार, रविंद्र अहिरराव, दत्तू पिंपळसे, प्रदीप निळे, अविनाश आहेर, अमोल पाटील, प्रवीण चिकणे यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्कार करत त्यांचे कौतुक केले व इतरांनीही यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. यावेळी कक्ष अभियंता खाडे, सहाय्यक अभियंता कल्याणी भोये, जितेंद्र देवरे, घनश्याम कुमार, गौरव पगार, सहाय्यक लेखापाल अमित मत्सागर, मानव संसाधनच्या प्रमुख भाग्यश्री हिरे आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here