
देवळा : देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी खालप येथील युवा उद्योजक कैलास आनंदा देवरे यांची तर व्हा चेअरमन पदी कांदा व्यापारी अमोल महारू आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक ३ मार्च रोजी बिनविरोध पार पडली. आज मंगळवारी दि ११ रोजी दुपारी २ वाजता या संघाच्या चेअरमन, व्हा चेअरमन पदाच्या निवडीसाठी सहायक निंबधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती .
यावेळी चेअरमन पदासाठी खालप ता देवळा येथील संचालक कैलास आनंदा देवरे यांचा तर व्हा चेअरमन पदासाठी अमोल महारू आहेर यांचा निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी संचालक सर्वश्री योगेश आहेर, चिंतामण आहेर, संजय गायकवाड, राजेंद्र ब्राह्मणकार,हंजराज जाधव,काशिनाथ पवार,नानाजी आहेर, रवींद्र जाधव ,साहेबराव सोनजे,सुलभा आहेर, अर्चना आहेर, सुवर्णा देवरे आदींसह सचिव गोरक्षनाथ आहेर उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे सहकार क्षेत्रातुन अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम