देवळा ; देवळा – कळवण या राज्यमार्गाची अत्यन्त दुर्दशा झाली असून,रस्त्यावर जागोजागी मोठे मोठी खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे . याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी ,अन्यथा या मार्गावरील रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन छेडण्याचा ईशारा वरवंडी येथील शिवसेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे .
पत्रकाचा आशय असा की , देवळा – कळवण या रस्त्याची अत्यन्त दुर्दशा झाली आहे . या मार्गावरून सप्तश्रृंगी गड ,सापुतारा कडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांबरोबरच इतर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते . मात्र ,या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडली आहेत .
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहनधारकांमध्ये खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा असा संभ्रम निर्माण झाला असून, या खड्डे चुकविण्यासाठी नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून, दोन दिवसांपूर्वी या रस्त्यावर भऊर फाट्यानजीक झालेल्या अपघातात दोन दुचाकी स्वार ठार झाले आहेत . या रहदारीच्या मार्गावर खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात घडत असून, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णतः दुर्लक्ष आहे .
अशी खंत वाहन धारकांनी व्यक्त केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल न घेतल्यास त्यांच्या विरोधात येत्या दोन दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे भाऊसाहेब चव्हाण यांनी शेवटी पत्रकाद्वारे दिला आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम