सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील न्यू एकता बहुउद्देशीय संस्था व केदानाना आहेर मित्रमंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश नानू आहेर यांनी दिली. सोमवार (दि.२६) रोजी या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने इतरही विविध कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहेत.
Deola | देवळ्यात सालाबादप्रमाणे कावड यात्रा संपन्न; केदा आहेर यांना राखी बांधून महिलांनी मानले आभार
सायंकाळी सहा वाजता अठरापगड जाती-धर्मीय जोडप्यांच्या हस्ते श्रीकृष्ण आरती व छत्रपती शिवरायांची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर कसमादे परिसरातील शालेय विद्यार्थी श्रीकृष्ण तसेच महाभारत थीम नृत्य सादर करतील. यादरम्यान शालेय विद्यार्थी व बालगोपाळांची राधाकृष्ण व सुदामा वेशभूषा स्पर्धा घेऊन विजेत्या बालगोपाळांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर दिग्गज अहिराणी कलाकारांचा लाईव्ह स्टेज शो आयोजित करण्यात आला आहे. यानंतर आलेल्या गोपाल पथकांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल.
Deola | देवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी
दहीहंडी फोडणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या पथकास नाफेडचे संचालक केदा आहेर यांच्याकडून ३१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर विशेष कौशल्याचे प्रदर्शन करणाऱ्या तीन पथकांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची बक्षिसे उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, नगराध्यक्षा भाग्यश्री पवार व उपनगराध्यक्ष मनोज आहेर यांच्यावतीने दिली जाणार आहेत. देवळा शहरात इतका भव्यदिव्य कार्यक्रम सादर होणार असल्याने या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन न्यू एकता मंडळाच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम