सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील विखाऱ्या डोंगरावर जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरक्षनाथ मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत योगा करताना दिसतात.
Deola | देवळा शहर व तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील ऐतिहासिक अशा धोडप किल्ल्या लगत असलेल्या विखाऱ्या डोंगरावर जागृत असे गोरक्षनाथ देवस्थान असून, याठिकाणी आज तालुक्यातील या डोंगर पायथ्याशी असलेल्या खर्डे व चांदवड तालुक्यातील धोंडबा, कानमंडाळे परिसरातील युवकांनी जागतिक योग दिन साजरा केला. विखाऱ्या डोंगरावर सकाळच्या वेळी येणारी वाऱ्याची झुळूक त्यात उल्हास दायक वातावरण, स्वच्छ हवेच्या ठिकाणी योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात विविध योगासनांनी भाविकांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह दिसून आला.
Deola | देवळा तालुक्यात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
यावेळी भाविकांनी मंदिरातील पुजारी गणेशपुरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, तालुक्यात शाळा, महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बापू सोनवणे, सोमनाथ जगताप, बापू जाधव, शशिकांत ठाकरे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम