देवळा | जनता विद्यालय लोहोणेर शाळेत प्रजासत्ताक दिन मुख्याध्यापक आर. एच देसले यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जनता विद्यालय माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष नितीन आहेर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक देशमुख, ग्रामपंचायत सरपंच मोहिनी अनिल आहेर, शालेय समिती सदस्य रमेश अहिरे, डॉक्टर सुभाष अहिरे, डॉक्टर रवींद्र शेवाळे, दीपक देशमुख, अशोक अहिरे अनंत शेवाळे, वसंत महाजन, कमलाकर नेरकर, निलेश गवळी, अथर्व चौधरी, राकेश जाधव, संजय सोनवणे, संजय कुऱ्हाडे, दशरथ शेवाळे, दादाजी शेवाळे इत्यादी व मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभासद, माजी सैनिक अनिल रतन सोनवणे, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण भैयासाहेब देशमुख यांनी केले व स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण नितीन आहेर यांनी केले. सूत्रसंचालन सलीम शाह व श्रद्धा शेवाळे यांनी केले. प्रास्ताविक अनिल शेवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम