सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास मंडळ आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सोमवारी दि.27 रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अमोल चिने (कवी, व्याख्याते, सूत्रसंचालक) हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की मराठी भाषेचे कौतुक खऱ्या अर्थाने साहित्याने केलं मग ते संत, पंथ, तंत या सर्वांनीच केलं. त्याच बरोबर ग्रामीण लोकगीतांनी ही केले. खऱ्या अर्थाने कवीनी ही भाषेचा गौरव केला आहे. कवी चिने यांनी स्वतःच्या कविताबरोबर कवी इंद्रजित भालेराव, कवी विष्णू थोरे, कवी प्रकाश घोडके, भरत दौंडकर, कवी अनिल दिक्षित इत्यादी कविच्या कविता गाऊन समाजाचे चित्र रेखाटले.
साहित्य समाजाचा आरसा आहे. कवीने आई, वडील, भाऊ, बहीण,नाती -गोती, मित्र यासर्वांचीच गरज प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची आहे, हे सांगितले. लेक सासरी जाण्याचे दुःख हे आईला जितके असते. तितकेच बापाला ही असते.हे आपल्या एका कवितेतून व्यक्त केले. भाषा ही एका ठिकाणी हसू आणि दुसऱ्या ठिकाणी रडू आहे. हिच भाषेची कला आहे. सर्वांनी वाचन वेड व्हावं, सुशिक्षित होण्यापेक्षा सु-संस्कारीत व्हावे. त्यातूनच नाती आणि मातीचे देणे देता येईल. भाषेच्या माध्यमातून परत एकदा संस्कृती फुलवता येईल त्यांनी आपल्या काव्यातून शेतकरी आणि गाव यांच्या भावना प्रकट केल्या. “अहो साहेब अन्न विना गुंग होईल मती, आम्ही बंद केले शेती तर काय खाशाल माती” आणि “गाव तरी आता कुठे गावासारखं राहिले, नखरे बाज झाली पोरं” अशा कवितेतून सद्यस्थिती मांडली.
Deola | शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या मुद्द्यांना शासननिर्णयात घेवू – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
या काळात आता बांधावर लढू नका आता लढायचे असेल तर शिक्षणासाठी लढा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट ही अधिक सकल लढायला शिवण्यासाठी येतात हे प्रत्येकाने ओळखावे. त्यांच्या बरोबर आलेले कवी रजनीकांत नवले (आरोग्य सेवक) यांनी देखील आपली एक स्वरचित कविता-वाघाची शेळी “या वाघासोबत अशी ही खेळी झाली आहे, या वाघाची आता शेळी झाली आहे” ही कविता विद्यार्थ्यांपुढे प्रस्तुत केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत प्रा. रवींद्र पगार यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, व्याख्याते प्रविण वाटोडे (आरोग्य सेवक, लासलगाव), उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर, उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाणे, प्रा. सी. बी. दाणी (एस. डी. ओ.) सर्व ज्ञानशाखांचे विभागप्रमुख व सहकारी प्राध्यापक वृंद,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. संदिप वळवी यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम