Deola : बदलापुरातील शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उमटले. शाळांमध्ये अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलण्यास आता सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी देवळा तालुक्यात सोमवार 26 ऑगस्ट रोजी आहेर महाविद्यालयात शाळा व्यवस्थापन आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत तालुक्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांनी उपस्थिती दर्शवली.
Deola | देवळा येथील आहेर महाविद्यालयात पालक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर
या कार्यशाळेत, सर्व शाळांमध्ये शासनाच्या निर्णयानुसार सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी तसेच ते फुटेज दर आठवड्याला तपासण्यात यावे, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तक्रार पेटी बसवणे अत्यावश्यक आहे, त्याचबरोबर विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शासन निर्णय आणि परिपत्रके यांनुसार सखी सावित्री व विशाखा समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. या समित्यांची नोंद ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही यावेळेस सांगण्यात आले.
Deola | देवळा येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून ‘मूक आंदोलन’
आवश्यकत्या सुविधा अमलात आणण्याचे निर्देश
त्याचबरोबर शाळांमध्ये नेमण्यात येणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. शाळा स्तरावर केली जाणारी कार्यवाही व उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेण्यात यावा यावरही जोर देण्यात आला. या कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, केंद्रप्रमुख घनश्याम बैरागी, प्रमिला अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे, राजेंद्र अहिरे, गंगाधर लोंढे, पि. के. आहेर, विषय तज्ञ संदीप जाधव, महेंद्र पवार, पल्लवी भामरे यांच्यासोबत तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्व मुख्याध्यापकांना आवश्यक त्या उपाययोजना लवकरात लवकर अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम