सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चणकापूर उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पूर पाण्याने रामेश्वर (किशोर सागर) धरण रविवारी रात्री ओवरफ्लो झाले असून, या धरणातून आज सोमवारी (दि.२६) रोजी देवळा तालुक्यातील पूर्व भागासाठी वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. देवळा तालुक्यात गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पूर्व व पश्चिम भागातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता. उन्हाळ्यात पिण्यासाठी वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आल्यावरही ते उमराण्यापर्यंत पोहचू न शकल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.
Deola | देवळा तालुक्यात संततधार; खर्डे परिसराला वरदान ठरणारे वार्षि धरण ‘ओवरफ्लो’
या वर्षी चणकापूर धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले. या पूर पाण्याने एकोणवीस दिवसात रामेश्वर (किशोर सागर) धरण रविवारी रात्री ओहरफ्लो झाल्याने आज सोमवारी दुपारी वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. यामुळे पूर्व भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने खर्डे परिसराला वरदान ठरणारे वार्षि धरणही ओहरफ्लो झाले असून, कोलथी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ते पाणी आता थेट रामेश्वर धरणात पडणार आहे. यामुळे रामेश्वर धरणातून आता पूर्व भागाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल अशी अपेक्षा पिंपळगाव, दहिवड, उमराणे आदी पूर्व भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम