देवळा: नाशिक जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकांचे ढग दाटले आहेत. याच पार्श्भूमीवर देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात ‘द पॉइंट नाऊ’ मीडिया ग्रुपने मालिका चालवली मात्र ही मालिका अनेकांना डोकेदुखी ठरली. अनेक नेत्यांचे सोज्वळ बुरखे फाडले गेल्याने ‘पॉइंट नाऊ’ कसे वाईट आहे हे आज सोशल मीडियावर दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या अशा बाबींना आम्ही डगमगलो नाही. आमची लेखणी धैर्याने चालू राहील.
या मालिका सुरू असताना देवळा शहरातील राव अचानक संतप्त झाले आणि धडा शिकविण्याची भाषा करू लागले. तर दादांनी कोर्टात खेचण्याची भाषा केली. तसे कोर्टात खेचण्यासाठी आधीही तीन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींकडून प्रयत्न झालेत. मात्र आम्ही लेखणी थांबवली नाही जनतेच्या हितासाठी जेजे लिहता येईल ते लीहण्याचा प्रयत्न करतोय.
आज जे काही आवाहन देण्यात आले की आम्हाला बोलण्यासाठी व्यासपीठ द्या आमची बाजू मांडू द्या. ते आम्ही स्वीकारले असून आज रात्री उशिरा उदयकुमार आहेर यांची मुलाखत घेण्याचे नियोजन करत आहोत. उद्या ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात येईल अजूनही कुणा नेत्यांना वाटत असेल पॉइंट नाऊ चुकतय तर त्यांनी संपर्क साधावा त्यांची देखील मुलाखत घेण्याची ताकद आमच्या लेखणीत आहे.
बाकी चुकीच्या घटनांची पोलखोल करण्याचे कार्य आमचे अविरत सुरू राहील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम