सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने शुक्रवार (दि.२६) जुलै रोजी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. लेफ्टनंट बादल लाड यांनी कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे.
Deola | देवळा महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या डिझाईन पेटंटला सरकारकडून मान्यता
त्यामुळे आजचा दिवस हा कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते. आहेर यांनी भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य, बलिदान यांना अभिवादन करणारा दिवस व भारतीयांचा ऊर ज्या आठवणीने भरून येतो तो हा दिवस असल्याचे सांगितले. यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.के. आहेर, डॉ.जे.आर. भदाणे व डॉ. संजय बनसोडे उपस्थित होते. आभार कॅडेट केजल पाटील यांनी मानले. महाविद्यालयाचे व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम