सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | 15 जानेवारी भूगोल दिनाच्या निमित्ताने येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शून्य कचरा व्यवस्थापन, शाश्वत विकासासाठी पुर्ननवीकरणीय उर्जा साधनांचा वापर, लोकसंख्या वाढ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोस्टर्स सादर केले. स्पर्धांचे उद्घाटन देवळा शिक्षण संस्थेच्या सचिव प्रोफेसर डॉ. मालतीताई आहेर यांचे हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी कचरा व्यवस्थापन ही अत्यंत गंभीर समस्या असून त्यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये शून्य कचरा करण्याच्या चळवळीत सामील व्हा आणि कचरा कमी करण्यासाठी आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यावहारिक धोरण जाणून घ्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.बादल लाड यांनी केले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी कचरा व्यवस्थापन हे शहरी भारतातील सर्वात मोठे आव्हान आहे.
Deola | कराटे चॅम्पियन उन्नती निकमचा विठेवाडीत सत्कार
केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला कचऱ्याच्या डोंगराचा सामना करावा लागत आहे. कचरा व्यवस्थापनाच्या पद्धती उपयोग करुन कचऱ्याचा पुनर्वापर या पद्धतीला कोणत्याही संसाधनांची आवश्यकता नाही. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात याचा खूप उपयोग होतो. रिसायकलिंग म्हणजे भंगलेल्या गोष्टींचा पुनर्वापर शिवाय पुनर्वापरामुळे कचऱ्याचे उपयुक्त स्त्रोतांमध्ये रूपांतर होत आहे. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आजपासूनच प्लास्टिक वापर बंद करणे गरजेचे आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ.डी.के. आहेर, उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाणे, डॉ.एस.डी.ठाकरे, डॉ. वाहुळे, या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. नितीन शेवाळे व शुभम मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन कुमार अजय महाले यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम