सायकलिस्ट जय बच्छाव ठरले सुपर रॅन्डोनियर

0
2

देवळा : या वर्षातील 200 किमी 400 km व 600 किमी सायकलिंग ब्रेव्हेट सह कोंकण ब्रेवेट ही सावंतवाडी खारेपाटण कणकवली पणजी या मार्गावरील 300 किलोमीटरची तीव्र चढ उताराची वर्षातील चौथी राईड निर्धारित वेळेच्या आत पूर्ण करून जय बच्छाव यांनी एस आर म्हणजे सुपर रॅन्डोनियर किताब पटकावला आहे. देवळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांचा जय हा मुलगा आहे .

फ्रान्समधील ॲडॉक्स क्लब पॅरिसिअन ही संस्था सायकलिंग मधील बी आर एम चे आयोजन करते 200 किमी 400 km 300 किमी व 600 किमी अशा लांब पल्ल्याच्या चार ब्रेव्हेट एका वर्षात पूर्ण केल्यास सुपर रॅन्डोनियर प्रमाणपत्र एडॉक्स इंडिया असोसिएशन तर्फे दिले जाते. केवळ तीनच महिन्यात प्रतिकूल परिस्थितीत वर मात करण्याची शारीरिक सुदृढता, नैसर्गिक अडथळ्यांशी स्पर्धा करणारी कणखर मानसिकता व कठोर मेहनतीच्या जोरावर जय यांनी हे आव्हान पूर्ण केले आहे .

पूर्ण केलेल्या चार स्पर्धा
त्यांनी पहिली 200 किलोमीटर ब्रेवेट नाशिक- येवला- वैजापूर -नाशिक ही निर्धारित साडेतेरा तासांची राईड नऊ तास 55 मिनिटातच पार केली. दुसरी ब्रेवेट 400 किलोमीटर ची धुळे- नाशिक -शिरपूर परत धुळे अशी 30 तासांची राईड त्यांनी 22 तास 54 मिनिटातच पार केली. यावेळी मुसळधार पावसाचाही सामना त्यांना करावा लागला. तिसरी ब्रेवेट 600 किलोमीटरची नाशिक -वैजापूर गंगापूर- पाडळशिंगी -गेवराई बीड- नाशिक अशी 40 तासांची राईड आठ तास आधीच म्हणजे 31 तास 45 मिनिटांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केली. यावेळी फक्त दोन ते अडीच तासांची विश्रांती त्यांनी घेतली. वर्षातली अखेरची कोकणातील आव्हानात्मक अशा तीव्र चढ उतारांची 300 km राईड सावंतवाडीला सुरू होऊन खारेपाटण -कणकवली -ओरोस- पणजी गोवा व परत सावंतवाडी अशी निर्धारित 20 तासांपेक्षा आधीच म्हणजे 17 तास 34 मिनिटात च पूर्ण करून सुपर रॅन्डोनियर किताब त्यांनी अर्जित केला

स्वतः अभियांत्रिकी पदविका धारक व रोटट्रॅक्ट क्लब चे माजी अध्यक्ष असून विविध सामाजिक उपक्रमात ते नेहमीच अग्रेसर असतात. वाढदिवसाला भेट स्वरूप वडिलांनी सायकल घेऊन दिली होती मात्र आपल्या अविरत सराव व कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी सुपर रॅन्डोनियर किताब पटकावून या वर्षाच्या वाढदिवसाची परत भेटच जणू वडिलांना दिली आहे. विशेष म्हणजे देवळा तालुक्यातील ते पहिले व नाशिक मधील सर्वात युवा एस आर म्हणून युवकां पुढे आदर्श ठरले आहेत.

राईड पूर्ण करताच देवळा सायकलिस्ट असोसिएशन च्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जय यांचे अभिनंदन केले. देवळा ,नाशिक, बागलाण, कळवण ,धुळे व कोकण सायकलिस्ट असोसिएशन च्या पदाधिकारी व सदस्यां चे अनमोल सहकार्य त्यांना लाभले. समाजाच्या सर्व स्तरावरून जय बच्छाव यांचे कौतुक करण्यात येत आहे.

जय बच्छाव यांनी प्रथम एस आर बहुमान पटकावून तालुक्याचा गौरव वाढवला आहे त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी राहू .

अरुण पवार -अध्यक्ष देवळा सायकलिस्ट


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here