सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील वाखारी येथे (दि.१९) रोजी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोने तसेच रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना घडली असून, या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वाखारी येथील चिंचबारी रोड परिसरात राहणारे भाऊसाहेब सुभाष जाधव हे कुटुंबासह (दि.१६) पासून धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असता या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेली पाच ग्रॅम सोन्याची आंगठी, कर्णफुले तसेच रोख रक्कम 3 हजार रुपये असा एकूण 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
Deola | देवळ्यात घरफोडीचे सत्र सुरूच; महालपाटणे येथे पुन्हा घरफोडी
घर मालक भाऊसाहेब जाधव हे (दि.१९) रोजी ते घरी आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व मागील बाजूचा दरवाजा तुटलेला दिसला. घरात चोरी झाल्याच्या संशयाने जाधव यांनी कपाट बघितल्यावर त्यांना कपाटाचा दरवाजा तोडलेला दिसला. चोरट्यांनी कपाटाच्या ड्रॉवर मधील वस्तू खाली फेकून त्यातील सोने व रोख रक्कम तीन हजार असा जवळपास तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. या बाबत जाधव यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह जाधव करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम